सेंद्रिय शेती (Organic Farming)

   

      नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत सेंद्रिय शेती कशा प्रकारे केली जाते. सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते करणे व पारंपरिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत पद्धतीने केलि जाणारी शेती. सेंद्रिय शेती करताना रसायनाचा न करता केवळ शेतातिल पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांती च्या आधी शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे.जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढुन पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या आरोग्यस पोषक असणाऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.

• सेंद्रिय शेती का केली पाहिजे. 

शेतीमध्ये रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांचा वापर अतिरीक्त झाला आहे. ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली असून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे जमिनीत विषारी घटक साचले आहेत. आणि मानवी आरोग्यावर त्यांचा दुष्परिणाम होत आहे. सेंद्रिय शेतीची गरज खालील कारणांमुळे निर्माण झाली आहे ::-

 1} पर्यावरणाचे रक्षण न करणे ::- रासायनिक शेतीमुळे जमिनीची आणि पाण्याची गुणवत्ता खराब होते. आणि सेंद्रिय शेती पर्यावरणाचा समतोल राखते.

2} जमिनीची सुपीकता टिकवणे ::-  सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची वाढ होते. ज्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते.

3} आरोग्यास पोषक अन्नधान्य ::- रसायनांपासून मुक्त अन्नधान्य शरीरासाठी आरोग्यदायी असते. आणि त्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यकआहे.

4} जमिनीतील दिर्घकालीन टिकाव ::- सेंद्रिय शेती जमिनीच्या पोषणमूल्यांमध्ये वृध्दी करते, ज्यामुळे भविष्यातही उत्पादन टिकून राहते.

• सेंद्रिय शेतीचि वैशिष्ट्ये. 

 1) नैसर्गिक खते व जैविक संसाधनांचा वापर ::-  सेंद्रिय शेतीत गोमुत्र, शेणखत, कंपोस्ट, हरीत खते, आणि गांडूळ खताचा वापर होतो.

२) पुनर्वापर व पुननिर्मिती ::- शेतातिल कचरा व अवशेष कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पुनर्वापर केला जातो.

३) पिक फेरपालट ::- जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी विविध पिकांची फेरपालट केली जाते.

4) जजैविक किटकनाशके ::-  झाडांच्या पानांपासून , निम व इतर अनेक वनस्पतींच्या आर्कांपसुन तयार केलेले जैविक कीटकनाशके वापरले जाते.

5) जलसंधारण व मृदा संरक्षण ::- सेंद्रिय शेतीत पाणी साठवणे आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यावर भर दिला जातो.

• ससेंद्रिय शेतीचे फायदे. 

– आरोग्यासाठी फायदेशीर अन्न : रसायनमुक्त अन्नामुळे आरोग्य सुधारते.

– पर्यावरणपूरक : रासायनिक शेती च्या तुलनेत सेंद्रिय शेतीत प्रदुषण कमी होते.

– जमीनीची सुधारणा : जैविक घटकांचा वापर केल्याने जमिनीची गुणवत्ता सुधारते.

– जैवविविधतेचे संवर्धन : किटक, पक्षी, आणि इतर जैविक घटकांना नैसर्गिक अधिवास मिळतो.

– खर्च कमी : रासायनिक खते व कीटकनाशकांवरचा खर्च कमी होतो. इतर.

• सेंद्रिय शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पध्दती.

– कंपोस्ट तयार करणे :  शेतीतील सेंद्रिय कचरा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.

– हरीत खताचा वापर : मुग, उदिड, साळी  यांसारख्या  हरीत खतांचा उपयोग मातीच्या पोषणासाठी केला जातो.

– जैविक किटकनाशके तयार करणे : निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, गोमुत्र अर्क, यांचा कीड नियंत्रणासाठी उपयोग केला जातो.

– शेतीतील जनवारांचा समावेश : जनवारांचे शेण व मुत्र खत म्हणून वापरण्यात येते, तसेच जनवारांच्या साहाय्याने शेताची नांगरणी केली जाते.

सेंद्रिय शेती ही केवळ शेतीची पध्दत नाही, तर ती पर्यावरण, मानवी आरोग्य, आणि निसर्गसंवर्धनाचा मार्ग आहे. रासायनिक शेती च्या परीणांमांपासुन पर्यावरण आणि मानवजात वाचवण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासाठी शेतकर्यांना प्रशिक्षण देणे, आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, आणि सेंद्रिय उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती च्या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी जग निर्माण करणे शक्य आहे.

 

 

You may also like...