Author: kaleabhijit981@gmail.com

पिक विमा योजनेमध्ये होणार बदल ?

♦ पिक विमा योजनेमध्ये होणार मोठा बदल ? जाणून घ्या  काय होणार बदल.

⇒ नुकसान भरपाई हि पिक कापणी प्रयोगावर आधारित : राज्याची मोहरे.

विमा हप्ता २ ते ५ टक्के आकारण्यात येणारे ;खरिफ पिक विमा उतरवणारे बनवत अर्जदार अन कंपन्यांना बसणार आळा, राज्य सरकारची झालेली नाचक्की दुर  होण्यास मदत होणार,

एका रुपयात खरीप पिक विमा योजनेत अनेक घोळ, गैरव्यवहार झाल्यानंतर आता हि योजना पिक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई आणि विमा हप्ता २ ते ५ टक्के आकारण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे कृषी विभागाच्या या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळची लवकरच मोहोरे उमटणार आहे. विमा उतरविणारे  बनावट अर्जदार आणि कंपन्याचे होणारे पांढळे उखळ याला चाप लावण्यासाठी एक रुपयात विमा योजनाच रद्द करण्यात येणार आह. यातून राज्य सरकारचा अनुदान पेटीचा निधीही वाचून योजनेचे झालेली नाचक्की दूर करण्याचा प्रयत्न आहे.

गेल्या दोन वर्षा पासून राज्यात राबविण्यात येणाऱ्या एक रुपयात खरिफ पिक विमा हि योजना सुरु करण्यात आली. या योजनेला पहिल्या वर्षी सुमारे १ कोटी ७० लाख शेतकर्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, या योजनेत अनेक गैरव्यवहार झाले.त्या मुले हि योजना वादाच्या भोवर्यात सापडली,परिणामी विमा योजनाच बंद करावी, आस राज्य सरकार विचार करीत होते. मात्र, यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली  नेमलेल्या समितीने या योजनाच्य अतीच बदलाव्यात, अशी महत्वपूर्ण शिफारस केली आहे, आतापर्यत प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा प्रीमियमच्या २ ते ५ टक्के शेतकरी भारत होता. तर उर्वरित हिस्सा केंद्र व राज्य सरकार भरत आसे.

एक रुपयाच्या योजनेमुळे राज्य सरकारला सुमारे ८ हजार कोटींचा विमा हप्ता कंपन्याकडे भरावा लागला होता, यातील २० टक्के कंपनीचा नफा गृहीत धरल्यास कंपन्यांचे उखळ पांधले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचत नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले होते, आसे होते. त्यामुळेच सहभाग मर्यादित असल्यास राज्य सरकारच्या निधीही वाचेल, असे मत या प्रस्तावातून व्यस्त करण्यात आले आहे. या प्रस्तावावर मंत्रिमंडळा च्या बैठकित  लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. आणि लवकरच नवीन योजनेला सुरुवात करणार.

 

लाडकी बहिण योजनेचे १३ लाख अर्ज अपात्र.

♦ लाडकी बहिण योजनेच्या १३ लाखांवर महिला ठरल्या अपात्र.

  1. विधानसभा निवडणुकीनंतर १३ लाखांवर महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले.अपात्र महिलांना सुमारे ९०० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या  छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून देता गोळा केला जात आहे.
  2.  या योजनेतून मिळणाऱ्या पैशाचा वापर सामुहीक उन्नतीसाठी करणाऱ्या महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र हि योजना काय असेल व ती कधी पासून अंमलात येणार याबाबत अजून स्पष्टता नाही.
  3. २.४७ कोटी महिलांनी आतापर्यंत घेतला आहे ‘मुख्यमंत्री माझीलाडकी बहिण योजने’चा लाभ.
  4. ३६००० कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहिण योजनेसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी करण्यात आली.
  5. २८ जून  २०२४  रोजी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी १ जुलै ते १५ ऑक्टोबर २०२४ हि अर्ज करण्याची मुदत होती. या काळात सुमारे २.५ कोटी महिलांना अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळाली.

♦ विधानसभा निवडणुकीपर्वी  महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तरीख १५ ऑक्टोबर २०२४ होती, त्यानंतर अनेक महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केली असून त्या या योजनेसाठी पात्र ठरत आहेत, ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरले त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत. मात्र, अर्ज नोंदणी सुरु नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का, असा प्रश्न आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे. राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरु करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील. मात्र या संधर्भात अद्याप कोणतीही हालचाल नसल्याने महिला व बालकल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

♦ आदिती तटकरे ,महिला व बालकल्याणमंत्री :-  या संदर्भातील मुळ शासन निर्णयात जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केली. अर्ज पुन्हा सुरु करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल.

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात सौर उर्जा क्रांती; ८४५० मेगावॉट विजनिर्मिती

 

     महाराष्ट्राने स्वच्छ उर्जेच्या प्रवासात केली महत्वपूर्ण प्रगती :सोलापूर, धुळे, जालना, बीड आणि सातारा हे जिल्हे ठरले आघाडीवर: सरकारचे मिळाले पाठबळ.

महाराष्ट्राने स्वच्छ उर्जेच्या प्रवासात एक महात्वपूर्ण यश मिळवले असून सौर उर्जा क्षमतेत ८४५० मेगावॉट चा टप्पा पार केला आहे. राज्याची एकत्रित सौर क्षमता ८४६६५०  मेगावॉट परेंत पोहोचली असून, यात रुफटोप सौरउर्जा प्रकल्प ( ३०३२८४ मेगावॉट ) आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे प्रकल्प (५० मेगावॉट ) याचा समावेश आहे.

⇒ ९६१ मेगावॉट क्षेमतेचे अनेक नवीन प्रकल्प सध्या कार्यान्विंत होत आहेत, महाराष्ट्र वीज निर्माती कंपनीचे एकूण २८६६६६ मेगावॉट क्षमतेचे ११ सौर प्रकल्पदेखील सुरु आहे.

♦ सौरउर्जे मध्ये महाराष्ट्रात अव्वल असणारे जिल्ले :-

    जिल्हे      कार्यान्वित ( मेगावॉट )     कार्यान्वित होणारे 

सोलापूर             ८७९.३२                      २३२.३९

धुळे                    ४९९.६९                     ५२

जालना                ४८९.८५                     ५१.५

धाराशिव             ३११.०४                      ७.३५

महाराष्ट्र              ८४६६.५                    ९६१.१८

♦देशभरात २४ सौर उद्याने कार्यन्वित 

  1. अधिकृत सूत्रांनुसार, देशभरात १५६३३ मेगावॉट क्षमतेची २४ सौर उद्याने कार्यन्वित झाली आहेत, त्यापैकी १२३९६ मेगावॉट आधिच स्थापित केले गेले आहेत.
  2. ४२७६ मेगावॉट क्षमतेसह राजस्थान आघाडीवर आहे. त्यानंतर ३९०० मेगावॉट क्षमतेसह आंध्रप्रदेश आणि ३१०० मेगावॉट क्षमतेसह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  3. पंजाब हरयाणा आणि पश्चिम बंगाल यांसारख्या प्रमुख राज्यांनी अद्याप या योजनेंतर्गत एकाहि सौर उद्यान स्थापित केले नाही.

  ४ अल्ट्रा-मेगा सोलर पॉवर पार्कला मंजुरी, दोंडाइंचा सोलर पार्क (२५० मेगावॉट), पाटोदा सोलर पार्क (२५० मेगावॉट), आणि साईगुरु सोलर पार्क ( ५०० मेगावॉट ) यासह चार मंजूर अल्ट्रा पॉवर पार्क सध्याच्या सौरउर्जा क्षमतेत ११०५ मेगावॉटची भर घालणार आहे.या मुले शेतकर्यांना खूप मोठा फायदा होईल, जास्त स्वरुपात लाईट बिल भरण्याचे काम नाही व काम पण सोप्पे होईल.

चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी २०२५ !!

|| भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशभरात सरासरीच्या तुलनेत चांगला पाउस पडेल, आसा अंदाज दिला असला तरी पावसाचे वितरण पाहता देशात इंशान्य आणि दक्षिण व उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्टाचा विचार करता मराठवाड्यासह राज्याच्या अंतर्गत भागात सरासरीपेक्षा चागल्या पावसाच्या शक्येतेचे संकेत आहेत. हि शक्येता सर्वसाधारणत ४० ते ५० टक्के आहे. मराठवाड्यासह आसपासच्या परिसरात शक्यता ६० ते ७० टक्के असून,येथेही सरासरी पेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. हा निष्कर्ष दिसत असला तरी मराठवाड्यात खूप पाऊस पडणार आणि बाकीच्या ठिकाणी कमी पाऊस पडेल,असे गृहीत धरता येणार नाही. कारण मान्सूनच्या दुसर्या टप्प्यातील पूर्वानुमान आद्यप आलेले नाही. मात्र, देशात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल हि चागली बातमी आहे.

राज्यात मार्च एप्रिल मधेच मान्सूनची उत्सुकता वाढीस लागते. दरम्यानच्या काळात राष्टीय व आंतरराष्टीय स्तरावरील संशोधन संस्थामधून जागतिक व राष्टीय हवामान अंदाज वर्तविले जातात. यात विशेषत मान्सूनचा हंगाम कसा असेल, या विषयी माहिती दिली जाते, आपल्याकडे १५० वर्षापसून भारतीय हवामानशास्त्र विभाग अविरतपणे काम करत आहे.त्यांच्या दीर्घकालीन पुर्वानुमानावर सर्वांच्या नजरा असतात, नुकतेच वर्तवीण्यात आलेल्या अंदाजानुसार, देशामध्ये चार महिन्यात सर्वसाधारणत सरासरीपेक्षा जास्त म्हणचे १०५ टक्के पाऊस पडेल, १९७१ ते २०२० दरम्यान च्या काळातील देशाची पावसाची आकडेवारी आहे ; त्यावरून देशाचा पाऊस ७८ सेमी आहे. त्याच्या १०५ टक्के पाऊस ज्याला आपण दीर्घकालीन सरासरी म्हणतो. एवढा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अर्थात हा संपूर्ण चार महिन्याचा अंदाज आहे. एप्रिल मध्ये केलेले हे अनुमान असून, यात काही त्रुटी असू शकतात, या त्रुटी ५ टक्के कमी व अधिक असू शकतात, हे देखील हवामान विभागाने नमूद केले आहे.हा अंदाज संपूर्ण देशासाठी आहे न कि कोणत्या राज्यासाठी किवां भूभागासाठी.

शेणखताची ताकद वाढवा करा हे काम ?

शेणखतामध्ये शेतीचा आर्क राहतो, शेतीमध्ये शेणखत टाकल्या नंतर तो तिथे सुधारतो आणि, आपल्या पिकला चागला फायदा झालेले दिसून येतो. जर शेणखताची ताकत अजून वाढली तर , पिकाला  पण चागलाच फायदा होईल . तर चला मग बगू शेणखताची ताकद वाढवण्यासाठी सर्लरी कशी तयार केली जाते.

  1. मित्रांनो आपण द्रावण तयार करणार आहोत , त्यात आपण १ लिटर NPK कॉन्सो, १ किलो ट्रायकोग्राम, १०० ग्राम वामिझोन, १ लिटर डी-कंपोस्ट, आणि २ किलो काळा गुळ (गुळाचे पाणी करून घेणे ), घ्यायचे आहे.
  2. एका ड्रमा मध्ये २०० लिटर स्वच्छ पाणी घ्यायचे आहे, त्यात हे सर्व घटक टाकून मिश्रण करून घ्ययचे आहे  आणि ते द्रावण हलवून घ्यायचे आहे.
  3. २ दिवस त्या द्रवनाला दिवसातून ३ वेळा हलवून घ्यायचे आहे, आणि त्या द्रवनाला २ दिवसा पर्यंत सावलीमध्ये झाकून ठेवायचे आहे.
  4. २ दिवसा नंतर ते द्रावण तयार झालेले असेल.

वापर कसा करायचा :- तयार केलेले सर्व द्रावण १  ट्रोली (३ टन) शेणखतामध्ये मिसळून घ्यायचे आहे, शेणखताचे मिश्रण हे सावली मध्ये करायचे, त्या नंतर शेणखत आपण शेती मध्ये वापरू शकतो.

पिकांसाठी कीटकनाशक निंबोळी आर्क कसे तयार केले जाते.

मित्रांनो पिकांवर किडीचा नाश करण्यासाठी वापरल्या जाणार्या कीटकनाश औषधांपैक्की एक घटक म्हणजे  जैविक निंबोळी आर्क . हा घटक आपण घरच्या घरी कसा बनवला जाईल ,याची सर्व सविस्तर माहिती बगणार आहोत .

  1. २० किलो निंम्बोळ्या गोळा करून त्या उन्हात वाळत घालाव्यात व साफ करून ठेवणे.
  2.  उन्हात वाळत घातलेल्या निंबोळ्या बारीक कुटून घेणे, व कुटून जाल्या नंत्तर एका ड्रम मध्ये टाकणे.
  3. ड्रम मध्ये ४० लिटर waste decomposer टाकणे , आणि त्यांचे मिश्रण करून घेणे .
  4. २० दिवसा पर्यत दिवसातून ३ वेळा ड्रम मधले मिश्रण हलवले पाहिजे.
  5. २० दिवस जाल्या नंतर आपले द्रव्य (निंबोळी आर्क ) तयार जालेले दिसते. त्या नंतर त्या मिश्रणनाला चाळणीने गाळून घ्यायचे, आणि जे आपल्याला लिक्विड स्वरुपात मिळते ते निंबोळी आर्क असते.

⇒ वापरण्याची पद्धत :- १०० लिटर साध पाणी घ्यायचे,आणि तयार झालेले  निंबोळी आर्क चे मिश्रण दोन्ही मिसळून घ्यायचे.आणि पिकांवर फवारणी करायची ,दर १५ दिवसांनी पिकावर निबोळी अर्क ची फार्वारणी करायची .कमी खर्चा मध्ये चागले उत्पन्न मिळते.

आजचे ताजे बाजार भाव

आज चे ताजे बाजार भाव  LIVE  स्वरुपात :-

नाशिक भाजीपाला बाजार भाव :-

     शिमला मिरची दर :-

कमीत कमी :- ८ रु किलो

जास्तीत जास्त :- १२ रु किलो 

सर्वसाधारण  :- १० रु किलो 

   काकडी दर :- 

कमीत कमी :- १२ रु किलो 

जास्तीत जास्त :-  २५ रु किलो 

सर्वसाधारण  :- १५ रु किलो 

    गिलके दर :-

कमीत कमी :- २० रु किलो 

जास्तीत जास्त :- २५ रु किलो 

सर्वसाधारण  :- —

   लाल वांगे दर :-

कमीत कमी :- १० रु किलो

जास्तीत जास्त :- २० रु किलो

सर्वसाधारण :- ७ रु किलो

  गावठी वांगे दर :- 

कमीत कमी :- ८  रु किलो

जास्तीत जास्त : १५ रु किलो

सर्वसाधारण :- १२ किलो

    कारले दर :-

कमीत कमी :- २० रु किलो 

जास्तीत जास्त :- ३० रु किलो 

सर्वसाधारण  :- १५ रु किलो

     दोडके दर :- 

कमीत कमी :- २० रु किलो 

जास्तीत जास्त :- ३५ रु किलो

सर्व्सादारण :- २५ रु किलो

 तुम्हाला जर हि माहिती चुकीची किवां खोटी बातमी वाटत असेल तर आपण चौकशी करू शकता, धन्यवाद.

जीवामृत कश्या प्रकारे तयार केले जाते.

जीवामृत असे तयार केले जाते :-

  1. जीवामृत तयार करण्यासाठी २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक ड्रममध्ये १७० लिटर स्वच्छ पाणी घ्यावे.
  2. १० किलोशेन, १० लिटर गोमुत्र, २ किलो काळा गुळ, २ किलो बेसन , २ कोळी जीवाणू माती व  २५० मिली उपलब्द जीवाणू सवर्धाके मिसळावी.
  3. .डावी कडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे ,  ७ दिवसात पिकांना देण्यासाठी जीवामृत तयार होते .
  4. प्रती एकरला २०० लिटर जीवामृत पुरेसे होते.

⇒ वापरण्याची पध्दत :- २०० लिटर जीवामृत पाटपाण्याने किवां कपड्याने गाळून  ड्रीप ने २० दिवसांच्या अंतराने पिक काढणी पर्यंत ध्यावे. फवारनिसाठी २० लिटर जीवामृत २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

⇒ जीवामृत खताचे फायदे :- सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकता. शेतातील भाजीपाला व फळांची प्रत हि सर्वौत्तम मिळू शकते . त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चागली राहत असल्याचा शेतकर्याचा अनुभव आहे .  व  पाढर्या मुळाची संख्या व आकार वाढतो , आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. कमी खर्चात चागले  उत्पादन मिळण्यास मदत होते.

ह्युंमिक एसिड कश्या प्रकारे तयार केले जाते.

ह्युमिक एसिड अश्या प्रकारे तयार करतात :-

  1. ड्रम मध्ये  २० लिटर पाण्यात ५ ते ७ किलो देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या टाका , त्यामध्ये 1 किलो दही , 1 किलो गुळ, २०० ग्राम बेसन पिट मिसरून घ्या .
  2. राहिलेले पाणी त्यामधे मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या.
  3. मिश्रण केलेला ड्रम सावलीमध्ये १०-१५  दिवसा पर्यंत ठेवावा. दिवसातून एकदा ते मिश्रण गोलाकार ढवळा.
  4. १०-१५  दिवसांनी ते मिश्रण कापडाच्या  सहाय्याने गाळून तुम्ही आवळनिसाठी वापरू शकता .

⇒ वापरण्याची पध्दत  :-  १ – २ लिटर प्रती एकर या प्रमाणात ड्रीप वाटे किवां पाटाच्या पाण्यावाटे पिकला द्यावे.

⇒ सेंद्रिय खताचे प्रकार :-  1) गांडूळ खात . २) सिटी कोंपोस्ट . ३)कोंबड खत. ४) फिश मिल (मासळी खत).  ५) बोनमील ( हाडाचा चुरा ). ६) प्रेस मड ( मळी).  ७) हिरवळीची पिके ( ताग/धेचा ). ८) निंबोळी पेंड. ९) उसाचे पाचट.  हि खते सेंद्रियशेती मध्ये उत्पादन वाढवणारी प्रमुख खाते आहे.

⇒ शेंद्रीय खताचे फायदे :- जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सेंद्रियखाते  महत्त्वाची ठरतात. जमिनीची सुपीकता, जैविक व भैतिक गोष्टीवर अवलंबून असते. लागवड करताना रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे जमिनिच्या सुपीकतेचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते. सेंद्रिय खतामुळे पांढर्या मुळांची संख्या व आकार वाढतो. आणि जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमानात उपलब्द होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पिक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. शेतात गांडूळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते. कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.

फळबाग लागवड अनुदान योजना / भाऊसाहेब फुंडकर योजना

.    सन २०१८-१९ पासून राज्यत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीन रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येनार आहे. सदर योजना शासनाच्या क्रूषी विभागामार्फत राबविली जात आहे.

  या योजनेत भाग घेण्यसाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीत जास्त १० हेक्टर आणि इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीत जास्त ६ हेक्टर. क्षेत्र मार्यदेत लाभ घेऊ शकतो.

   योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०% , दुसऱ्या वर्षी ३०% ,आणि तीसऱ्य वर्षी २०% , अश्या तिन वर्षात देण्यात येनार असुन शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यसाठी लागवड केलेल्या झाडचे जीविताचे प्रमाण बागायती झाडासाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी जल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे.

   अल्प, अत्यल्प भूधारक, महिला व दिव्यंग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य आहे. महात्मा गाँधी राष्टीय ग्रामीन रोजगार हमी योजनेतर्गत पात्र लाभार्थना प्रथम त्या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे, उर्वरीत क्षेत्रासाठी ( वरील क्षेत्र मर्यादेच्या आधीन राहून) लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकतात.

• उमेदवाराची पात्रता. 

१) लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थींना देय नाही.

२) लाभार्थ्यांस फ़ळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे.

३) शेतकऱ्यास स्वत:च्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे. सायुक्त मालकी असल्यास इतर खातेदाराचे संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हीश्याच्या मार्यदेत लाभ घेता येईल.

४) सर्व प्रवर्गअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुंटुबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्यांना प्रथम प्राधन्य देण्यात येईल व त्यनांतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. ( कुटुंबाची व्याख्या : पती, पत्नी, व अज्ञात मुले)

५) परंपरगत वन निवासी (वन आधीकार मान्यता) आधीनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यात पात्र आहे.

६) ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास, कुळाची संमती अवश्यक आहे.