शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात सौर उर्जा क्रांती; ८४५० मेगावॉट विजनिर्मिती
महाराष्ट्राने स्वच्छ उर्जेच्या प्रवासात केली महत्वपूर्ण प्रगती :सोलापूर, धुळे, जालना, बीड आणि सातारा हे जिल्हे ठरले आघाडीवर: सरकारचे मिळाले पाठबळ.
महाराष्ट्राने स्वच्छ उर्जेच्या प्रवासात एक महात्वपूर्ण यश मिळवले असून सौर उर्जा क्षमतेत ८४५० मेगावॉट चा टप्पा पार केला आहे. राज्याची एकत्रित सौर क्षमता ८४६६५० मेगावॉट परेंत पोहोचली असून, यात रुफटोप सौरउर्जा प्रकल्प ( ३०३२८४ मेगावॉट ) आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे प्रकल्प (५० मेगावॉट ) याचा समावेश आहे.
⇒ ९६१ मेगावॉट क्षेमतेचे अनेक नवीन प्रकल्प सध्या कार्यान्विंत होत आहेत, महाराष्ट्र वीज निर्माती कंपनीचे एकूण २८६६६६ मेगावॉट क्षमतेचे ११ सौर प्रकल्पदेखील सुरु आहे.
♦ सौरउर्जे मध्ये महाराष्ट्रात अव्वल असणारे जिल्ले :-
जिल्हे कार्यान्वित ( मेगावॉट ) कार्यान्वित होणारे
सोलापूर ८७९.३२ २३२.३९
धुळे ४९९.६९ ५२
जालना ४८९.८५ ५१.५
धाराशिव ३११.०४ ७.३५
महाराष्ट्र ८४६६.५ ९६१.१८
♦देशभरात २४ सौर उद्याने कार्यन्वित
- अधिकृत सूत्रांनुसार, देशभरात १५६३३ मेगावॉट क्षमतेची २४ सौर उद्याने कार्यन्वित झाली आहेत, त्यापैकी १२३९६ मेगावॉट आधिच स्थापित केले गेले आहेत.
- ४२७६ मेगावॉट क्षमतेसह राजस्थान आघाडीवर आहे. त्यानंतर ३९०० मेगावॉट क्षमतेसह आंध्रप्रदेश आणि ३१०० मेगावॉट क्षमतेसह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- पंजाब हरयाणा आणि पश्चिम बंगाल यांसारख्या प्रमुख राज्यांनी अद्याप या योजनेंतर्गत एकाहि सौर उद्यान स्थापित केले नाही.
४ अल्ट्रा-मेगा सोलर पॉवर पार्कला मंजुरी, दोंडाइंचा सोलर पार्क (२५० मेगावॉट), पाटोदा सोलर पार्क (२५० मेगावॉट), आणि साईगुरु सोलर पार्क ( ५०० मेगावॉट ) यासह चार मंजूर अल्ट्रा पॉवर पार्क सध्याच्या सौरउर्जा क्षमतेत ११०५ मेगावॉटची भर घालणार आहे.या मुले शेतकर्यांना खूप मोठा फायदा होईल, जास्त स्वरुपात लाईट बिल भरण्याचे काम नाही व काम पण सोप्पे होईल.