जीवामृत कश्या प्रकारे तयार केले जाते.

जीवामृत असे तयार केले जाते :-
- जीवामृत तयार करण्यासाठी २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक ड्रममध्ये १७० लिटर स्वच्छ पाणी घ्यावे.
- १० किलोशेन, १० लिटर गोमुत्र, २ किलो काळा गुळ, २ किलो बेसन , २ कोळी जीवाणू माती व २५० मिली उपलब्द जीवाणू सवर्धाके मिसळावी.
- .डावी कडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे , ७ दिवसात पिकांना देण्यासाठी जीवामृत तयार होते .
- प्रती एकरला २०० लिटर जीवामृत पुरेसे होते.
⇒ वापरण्याची पध्दत :- २०० लिटर जीवामृत पाटपाण्याने किवां कपड्याने गाळून ड्रीप ने २० दिवसांच्या अंतराने पिक काढणी पर्यंत ध्यावे. फवारनिसाठी २० लिटर जीवामृत २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
⇒ जीवामृत खताचे फायदे :- सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकता. शेतातील भाजीपाला व फळांची प्रत हि सर्वौत्तम मिळू शकते . त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चागली राहत असल्याचा शेतकर्याचा अनुभव आहे . व पाढर्या मुळाची संख्या व आकार वाढतो , आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. कमी खर्चात चागले उत्पादन मिळण्यास मदत होते.