ह्युंमिक एसिड कश्या प्रकारे तयार केले जाते.

ह्युमिक एसिड अश्या प्रकारे तयार करतात :-

  1. ड्रम मध्ये  २० लिटर पाण्यात ५ ते ७ किलो देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या टाका , त्यामध्ये 1 किलो दही , 1 किलो गुळ, २०० ग्राम बेसन पिट मिसरून घ्या .
  2. राहिलेले पाणी त्यामधे मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या.
  3. मिश्रण केलेला ड्रम सावलीमध्ये १०-१५  दिवसा पर्यंत ठेवावा. दिवसातून एकदा ते मिश्रण गोलाकार ढवळा.
  4. १०-१५  दिवसांनी ते मिश्रण कापडाच्या  सहाय्याने गाळून तुम्ही आवळनिसाठी वापरू शकता .

⇒ वापरण्याची पध्दत  :-  १ – २ लिटर प्रती एकर या प्रमाणात ड्रीप वाटे किवां पाटाच्या पाण्यावाटे पिकला द्यावे.

⇒ सेंद्रिय खताचे प्रकार :-  1) गांडूळ खात . २) सिटी कोंपोस्ट . ३)कोंबड खत. ४) फिश मिल (मासळी खत).  ५) बोनमील ( हाडाचा चुरा ). ६) प्रेस मड ( मळी).  ७) हिरवळीची पिके ( ताग/धेचा ). ८) निंबोळी पेंड. ९) उसाचे पाचट.  हि खते सेंद्रियशेती मध्ये उत्पादन वाढवणारी प्रमुख खाते आहे.

⇒ शेंद्रीय खताचे फायदे :- जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सेंद्रियखाते  महत्त्वाची ठरतात. जमिनीची सुपीकता, जैविक व भैतिक गोष्टीवर अवलंबून असते. लागवड करताना रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे जमिनिच्या सुपीकतेचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते. सेंद्रिय खतामुळे पांढर्या मुळांची संख्या व आकार वाढतो. आणि जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमानात उपलब्द होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पिक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. शेतात गांडूळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते. कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.

You may also like...