शेणखताची ताकद वाढवा करा हे काम ?

शेणखतामध्ये शेतीचा आर्क राहतो, शेतीमध्ये शेणखत टाकल्या नंतर तो तिथे सुधारतो आणि, आपल्या पिकला चागला फायदा झालेले दिसून येतो. जर शेणखताची ताकत अजून वाढली तर , पिकाला  पण चागलाच फायदा होईल . तर चला मग बगू शेणखताची ताकद वाढवण्यासाठी सर्लरी कशी तयार केली जाते.

  1. मित्रांनो आपण द्रावण तयार करणार आहोत , त्यात आपण १ लिटर NPK कॉन्सो, १ किलो ट्रायकोग्राम, १०० ग्राम वामिझोन, १ लिटर डी-कंपोस्ट, आणि २ किलो काळा गुळ (गुळाचे पाणी करून घेणे ), घ्यायचे आहे.
  2. एका ड्रमा मध्ये २०० लिटर स्वच्छ पाणी घ्यायचे आहे, त्यात हे सर्व घटक टाकून मिश्रण करून घ्ययचे आहे  आणि ते द्रावण हलवून घ्यायचे आहे.
  3. २ दिवस त्या द्रवनाला दिवसातून ३ वेळा हलवून घ्यायचे आहे, आणि त्या द्रवनाला २ दिवसा पर्यंत सावलीमध्ये झाकून ठेवायचे आहे.
  4. २ दिवसा नंतर ते द्रावण तयार झालेले असेल.

वापर कसा करायचा :- तयार केलेले सर्व द्रावण १  ट्रोली (३ टन) शेणखतामध्ये मिसळून घ्यायचे आहे, शेणखताचे मिश्रण हे सावली मध्ये करायचे, त्या नंतर शेणखत आपण शेती मध्ये वापरू शकतो.

You may also like...