चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी २०२५ !!

|| भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशभरात सरासरीच्या तुलनेत चांगला पाउस पडेल, आसा अंदाज दिला असला तरी पावसाचे वितरण पाहता देशात इंशान्य आणि दक्षिण व उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्टाचा विचार करता मराठवाड्यासह राज्याच्या अंतर्गत भागात सरासरीपेक्षा चागल्या पावसाच्या शक्येतेचे संकेत आहेत. हि शक्येता सर्वसाधारणत ४० ते ५० टक्के आहे. मराठवाड्यासह आसपासच्या परिसरात शक्यता ६० ते ७० टक्के असून,येथेही सरासरी पेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. हा निष्कर्ष दिसत असला तरी मराठवाड्यात खूप पाऊस पडणार आणि बाकीच्या ठिकाणी कमी पाऊस पडेल,असे गृहीत धरता येणार नाही. कारण मान्सूनच्या दुसर्या टप्प्यातील पूर्वानुमान आद्यप आलेले नाही. मात्र, देशात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल हि चागली बातमी आहे.

राज्यात मार्च एप्रिल मधेच मान्सूनची उत्सुकता वाढीस लागते. दरम्यानच्या काळात राष्टीय व आंतरराष्टीय स्तरावरील संशोधन संस्थामधून जागतिक व राष्टीय हवामान अंदाज वर्तविले जातात. यात विशेषत मान्सूनचा हंगाम कसा असेल, या विषयी माहिती दिली जाते, आपल्याकडे १५० वर्षापसून भारतीय हवामानशास्त्र विभाग अविरतपणे काम करत आहे.त्यांच्या दीर्घकालीन पुर्वानुमानावर सर्वांच्या नजरा असतात, नुकतेच वर्तवीण्यात आलेल्या अंदाजानुसार, देशामध्ये चार महिन्यात सर्वसाधारणत सरासरीपेक्षा जास्त म्हणचे १०५ टक्के पाऊस पडेल, १९७१ ते २०२० दरम्यान च्या काळातील देशाची पावसाची आकडेवारी आहे ; त्यावरून देशाचा पाऊस ७८ सेमी आहे. त्याच्या १०५ टक्के पाऊस ज्याला आपण दीर्घकालीन सरासरी म्हणतो. एवढा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अर्थात हा संपूर्ण चार महिन्याचा अंदाज आहे. एप्रिल मध्ये केलेले हे अनुमान असून, यात काही त्रुटी असू शकतात, या त्रुटी ५ टक्के कमी व अधिक असू शकतात, हे देखील हवामान विभागाने नमूद केले आहे.हा अंदाज संपूर्ण देशासाठी आहे न कि कोणत्या राज्यासाठी किवां भूभागासाठी.

You may also like...